‘ता उम्र गालिब हम यही भूल करते रहे… शेरोशायरी करत फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा
देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीवर टीकास्त्र सोडलं. मी राहुल गांधी यांच्यासाठी एवढंच म्हणू शकतो की, ताउम्र गालिब हम यही भूल करते रहे, धूल चेहरे पे थी, और आईना साफ करते रहे' अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ईव्हीएममध्ये फेरफार केल्याचा आरोप महायुतीवर केला जात आहे. काल काँग्रेस नेते राहुल गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाला अनेक सवाल विचारले. या पत्रकार परिषदेत राहुल गांधींनी ईव्हीएममध्ये कशाप्रकारे फेरफार झाला, मतदार कसे वा़ढले, याबद्दल सविस्तर भाष्य केले. मात्र त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीवर टीकास्त्र सोडलं. मी राहुल गांधी यांच्यासाठी एवढंच म्हणू शकतो की, ताउम्र गालिब हम यही भूल करते रहे, धूल चेहरे पे थी, और आईना साफ करते रहे’ अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.
जनतेने त्यांची साथ सोडली आहे, हे राहुल गांधी जोपर्यंत समजून घेणार नाहीत, तोपर्यंत त्यांचा असाच पराभव होत राहील. तुमच्यासोबत कोण असतं हेही बऱ्याचवेळेस महत्वाचं असतं.एवढ्या मोठ्या प्रेस कॉन्फरन्ससाठी जर तुम्ही संजय राऊत यांना सोबत घेऊन बसलात तर असेच विचार डोक्यात येतील, असे म्हणत फडणवीस यांनी राऊतांवरही खोचक टीका केली.
