Satara Video : देवाच्या पायापर्यंत पाणी… चारही बाजूने वेढा, साताऱ्यातील वाईच्या गणपतीला पावसाचा फटका
सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. धोम धरणातून मध्यरात्री पाण्याचा विसर्ग वाढवल्याने वाईमधील कृष्णा नदी दुथडी भरून वाहू लागलीये
सातारा जिल्ह्यातील धोम धरणातून मध्यरात्री पाण्याचा विसर्ग वाढवलाय. यामुळे वाईमधील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कृष्णा दुथडी भरून वाहू लागली असून कृष्णा नदीने रौद्र रूप धारण केल्यामुळे वाईमधील कृष्णा नदी पात्राजवळील प्रसिद्ध असलेल्या महागणपती मंदिरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळतंय. साताऱ्यातील प्रसिद्ध असलेल्या महागणपती मंदिरात असलेल्या गणपती बाप्पाच्या पायापर्यंत पावसाचे पाणी पोहोचलं असून या मंदिराला चारही बाजूने नदीच्या पूरातील पाण्याने वेढले आहे. सध्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात घाटमाथ्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळी वाढल्याने वाईच्या महागणपती मंदिराला कृष्णा नदीच्या पाण्याने वेढल्याचे पाहायला मिळत आहे. बघा ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली दृश्य
Published on: Aug 19, 2025 02:14 PM
