OBC Reservation : कुणाच्या बापाची पेंड… जरांगेंचा भडकले; ओबीसी नेत्यांचं घमासान, GR रद्द करण्याची मागणी

OBC Reservation : कुणाच्या बापाची पेंड… जरांगेंचा भडकले; ओबीसी नेत्यांचं घमासान, GR रद्द करण्याची मागणी

| Updated on: Oct 04, 2025 | 2:09 PM

ओबीसी नेते आज मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वाच्या बैठकीत सहभागी होणार आहेत. जीआर रद्द करण्याच्या मागणीवर ते ठाम असून, रद्द न झाल्यास चर्चा निरर्थक ठरेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

ओबीसी नेत्यांची आज मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वाची बैठक नियोजित आहे. या बैठकीत जीआर रद्द करण्याच्या मागणीवरून ओबीसी नेत्यांमध्ये घमासान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ओबीसी नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, जीआर रद्द झाल्याशिवाय कोणतीही चर्चा सुरू होणार नाही, कारण हा जीआर ओबीसी समाजाचा विश्वासघात आहे.

विजय वडेट्टीवार हे बैठकीला उपस्थित राहणार असून, छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीकडे लक्ष लागले आहे. ओबीसी नेत्यांचे म्हणणे आहे की, जर हा जीआर रद्द झाला, तर ते मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतील. हैदराबाद गॅझेटच्या आधारे मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी दाखले देण्याचा हा प्रकार असून, यामुळे ओबीसींचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर मनोज जरांगेंविरोधात ओबीसी नेते एकवटले असून जीआर रद्द करण्याच्या मागणीवर ठाम असल्याने जरांगे चांगलेच आक्रमक झालेत.

Published on: Oct 04, 2025 02:07 PM