ओबीसी आरक्षण संपलंय! लक्ष्मण हाकेंचं मोठं विधान
नुकत्याच जाहीर झालेल्या मराठा आरक्षणासंबंधीच्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धोका निर्माण झाला आहे. छगन भुजबळ यांसारख्या नेत्यांनी या निर्णयाचा निषेध केला असून, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात आणि रस्त्यावर लढला जाईल असेही सूचित केले आहे.
महाराष्ट्रात मराठा आरक्षणाबाबतच्या निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. याबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या छगन भुजबळ यांनी सरकारच्या निर्णयावर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. याबाबत आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मोठं विधान केलं आहे. त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचं समर्थन करत हा निर्णय बेकायदेशीर आहे आणि तो ओबीसी समाजाच्या हक्कांवर घाला घालतो. भुजबळ यांनी ओबीसी मंत्र्यांनाही त्यांची भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले आहे. या निर्णयाचा परिणाम ओबीसी विद्यार्थी आणि पंचायतराज घटकांवर होईल, असे भुजबळ यांनी सांगितले. ओबीसी समाजाच्या हक्कांचा बचाव करण्यासाठी न्यायालयात आणि रस्त्यावर लढा दिला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
Published on: Sep 03, 2025 03:00 PM
