Mahayuti | महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकर यांची गणेश नाईकावर जोरदार टीका

Mahayuti | महायुतीत वाद पुन्हा तापला; रवींद्र धंगेकर यांची गणेश नाईकावर जोरदार टीका

| Updated on: Feb 16, 2026 | 2:07 PM

राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील टीका-टिप्पणी अजूनही सुरू आहे. याप्रकरणी आता रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

महायुतीमधील दोन प्रमुख नेते, मंत्री गणेश नाईक आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यातील वाद पुन्हा एकदा समोर आला आहे. गेल्या काही काळापासून दोघांमध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे. गणेश नाईकांनी नगरविकास खात्याच्या कारभारावर टीका करत नवी मुंबईतील मोकळे भूखंड बिल्डरांना दिल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांच्यावर केला होता. राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील टीका-टिप्पणी अजूनही सुरू आहे. याप्रकरणी आता रवींद्र धंगेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. धंगेकर यांनी ट्विट करत सांगितले की, “विकासाच्या रथाबरोबर स्पर्धा करण्याची तुमची पात्रता नाही,” असे म्हणत त्यांनी एका फोटो सुध्दा ट्विट केला आहे. त्यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

Published on: Feb 16, 2026 02:07 PM