NCP Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही? शरद पवारांनी ठरवलं… अजितदादांना संधीसाधू म्हटलं अन्…

NCP Pawar : दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की नाही? शरद पवारांनी ठरवलं… अजितदादांना संधीसाधू म्हटलं अन्…

| Updated on: Jun 18, 2025 | 9:06 AM

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यावरून शरद पवारांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. भाजप सोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही. सत्तेसाठी भाजप सोबत जाणे म्हणजे संधी साधूपणा आहे अशी टीकाही शरद पवारांनी केली.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अशी चर्चा सुरू असतानाच शरद पवारांनीच आता अंतिम शिक्कामोर्तब केलाय. भाजपसोबत गेलेल्यांना सोबत घेणार नाही. भाजप सोबत जाणे हा काँग्रेसचा विचार नाही. त्यामुळे सत्तेसाठी भाजप सोबत जाणे म्हणजे संधीसाधूपणा आहे असं रोखठोक वक्तव्य शरद पवार यांनी केलंय.

गेल्या काही दिवसात शरद पवार आणि सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्यात ते ही पाहूया. ८ मे रोजी शरद पवार एका मुलाखतीत म्हणाले की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात का याचा निर्णय सुप्रिया सुळे यांनी घ्यावा. १० जूनला सुप्रिया सुळे म्हणाल्या की पक्षात लोकप्रतिनिधींना विचारून निर्णय होईल. १४ जूनला पवारांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप सोडून आघाडीच्या सूचना दिल्या असं कळत आहे. आता पवारांनी भाजप सोबत जाणे हा काँग्रेसचा विचार नसल्याच सांगून अशा लोकांसोबत जाणार नाही हे स्पष्ट केलंय.

भूमिका स्पष्ट करतानाच शरद पवारांनी अप्रत्यक्षपणे अजित पवारांना संधीसाधू म्हटलंय. ७ दिवसांआधीच २०१९ मध्ये शरद पवारांनी शिवसेनेसोबत जाऊन कशी तडजोड केली हे वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात अजित पवारांनी सांगितलं. बघा काय म्हणाले अजित पवार?

Published on: Jun 18, 2025 09:06 AM