Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? हवामान खात्याचा अलर्ट काय?

Mumbai Rain : मुंबईसह उपनगरात रात्रभर पावसाची बॅटिंग, कुठे काय परिस्थिती? हवामान खात्याचा अलर्ट काय?

| Updated on: Jun 16, 2025 | 8:47 AM

मुंबईतील हिंदमाता, सायन, दादर यांसारख्या सखल जलमय झाला आहे तर दुसरीकडे पुणे आणि कोल्हापूरच्या घाट परिसरात, सातारा जिल्हा परिसरात आज ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे.

मुंबई आणि उपनगरमध्ये काल रात्रीपासूनच पावसाच्या सरी बरसत असल्याचे पाहायला मिळत आहे. काल रात्री मुसळधार पाऊस झाला असून मुंबईतील सायन आणि दादर येथील रस्ते जलमय झाले आहेत तर सखल भागात पाणी साचलं आहे. सायन, दादर, परळ, वांद्रे, विलेपार्ले आणि अंधेर या भागातही पावसाची हजेरी पाहायला मिळाली. यामुळे नागरिकांची एकच तारांबळ उडाली. तर हवामान खात्याकडून आज मुंबई शहरासह ठाणे आणि पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कालपासून मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या पावसामुळे मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल पाच ते दहा मिनिटे उशिराने धावत आहेत. तर दुसरीकडे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला असून या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबई आणि ठाण्यात आज ‘यलो अलर्ट’ असल्याने काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे.

Published on: Jun 16, 2025 08:47 AM