Maharashtra Rain: पुढील 2 ते 3 दिवस मुसळधार; अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी
Maharashtra Weather Updates : राज्यात कालपासून पावसाला सुरुवात झाली असून येते 2 दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. कालपासून राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. तर पुढील दोन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दक्षिण कोकण-गोवा, उत्तर मध्य महाराष्ट्रातील घाटमाथा, उत्तर कोकणातील काही ठिकाणे आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील चक्री वाऱ्यांमुळे पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे.
पुणे वेधशाळेने पुढील दोन दिवस राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. विशेषतः पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर आज आणि उद्या अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे. यामुळे हवामान विभागाने घाट परिसरासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Published on: Jul 07, 2025 08:31 AM
