सनातनी दहशतवाद म्हणा, पण भगवा शब्द..; पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

सनातनी दहशतवाद म्हणा, पण भगवा शब्द..; पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान

| Updated on: Jul 31, 2025 | 7:06 PM

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी विशेष एनआयए न्यायालयात झाली असून त्यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी विशेष एनआयए न्यायालयात झाली, आणि पुराव्यांच्या अभावी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली. 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला होता, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले होते. या निकालानंतर सत्ताधारी भाजपाने काँग्रेसने माफी मागावी, अशी मागणी केली आहे. याचवेळी, राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

चव्हाण म्हणाले, “मालेगाव बॉम्बस्फोट 2008 मध्ये झाला आणि हा खटला 17 वर्षे चालला. कोणीतरी हा स्फोट घडवला, पण तपासात प्रतिकूल पुरावे आणि साक्षीदारांचे सहकार्य न मिळाल्याने तपास अपूर्ण राहिला. आरडीएक्स बाजारात सहज उपलब्ध होत नाही. एनआयए केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नियंत्रणाखाली काम करते. या स्फोटात अनेक लोक जखमी झाले, पण न्यायालयाच्या निकालानुसार कोणीही दोषी नाही. मग हा स्फोट कोणी घडवला?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

तसेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या “दहशतवाद भगवा कधीच नव्हता, नाही आणि यापुढेही असणार नाही” या ट्वीटवर भाष्य करताना चव्हाण म्हणाले, “‘भगवा’ हा शब्द वापरू नये. भगवा आमच्यासाठी पवित्र रंग आहे, तो संत ज्ञानेश्वर आणि महाराजांचा रंग आहे. त्याऐवजी ‘सनातनी दहशतवाद’ असा उल्लेख करा. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो.”

Published on: Jul 31, 2025 07:02 PM