Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
स्थानीय न्यायालयाने अटकेचे वॉरंट जारी केल्यानंतर माणिकराव कोकाटे यांचे वकील ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे स्पष्ट केले. उच्च न्यायालयात शिक्षेला स्थगिती आणि जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकाटे यांच्या सध्याच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरणागतीसाठी चार दिवसांची मुदत मागण्यात आली होती.
स्थानीय न्यायालयाने माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केल्यानंतर त्यांचे वकील ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोकाटे यांना झालेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात आधीच अपील दाखल करण्यात आले आहे. या अपिलावर तातडीने सुनावणी व्हावी यासाठी उद्या प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. ॲडव्होकेट पिंगळे यांनी स्थानिक न्यायालयात कोकाटे यांच्या शरणागतीसाठी चार दिवसांची मुदत मागितली होती. कोकाटे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना शरणागतीसाठी वेळ मिळावी, अशी विनंती करण्यात आली होती. आता संपूर्ण कायदेशीर लढाई उच्च न्यायालयात लढली जाईल, जिथे शिक्षेला स्थगिती मिळवून जामीन मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ॲडव्होकेट मनोज पिंगळे यांनी सांगितले
