Manoj Jarange Patil Video : ‘त्या’ हत्येची धनंजय मुंडेंकडे पूर्ण माहिती? खंडणीवरूनही जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा

Manoj Jarange Patil Video : ‘त्या’ हत्येची धनंजय मुंडेंकडे पूर्ण माहिती? खंडणीवरूनही जरांगे पाटलांचा खळबळजनक दावा

| Updated on: Mar 10, 2025 | 2:03 PM

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून एक एक माहिती रोज नव्याने समोर येत असताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केलेत.

धनंजय मुंडे यांना जाणून बुजून वाचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे करत आहेत, असं वक्तव्य करत मनोज जरांगे पाटील यांनी आरोप केला आहे. तर धनंजय मुंडे यांच्या कार्यालयातील काम एक नंबरचा आरोपी करत होता. त्यामुळे धनंजय मुंडे यांच्याकडे खंडणी गेली होती. इतकंच नाहीतर धनंजय मुंडे यांच्याकडे हत्येचीही पूर्ण माहिती आहे, असा खळबळजनक दावाही मनोज जरांगे पाटील यांनी केला. बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्या राजीनामा या विषयाला देवेंद्र फडणवीस यांच्याकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. हे आता उघड होत आहे. गुप्त तपास यंत्रणा आणि पोलीस प्रशासनाला या प्रकरणी पूर्णविराम देण्यास सांगितले होते. हे आता उघड व्हायला लागलं आहे. कारण धनंजय मुंडे हे कलम ३०२ मध्ये अडकत होते, असा हल्लाबोल देखील मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Published on: Mar 10, 2025 02:03 PM