Manoj jarange Video : ‘मला भेटायला आले तेव्हा मुंडेंसोबत कराड पण होता अन्…’, ‘तो’ किस्सा सांगून जरांगेंचा गौप्यस्फोट

Manoj jarange Video : ‘मला भेटायला आले तेव्हा मुंडेंसोबत कराड पण होता अन्…’, ‘तो’ किस्सा सांगून जरांगेंचा गौप्यस्फोट

| Updated on: Feb 03, 2025 | 2:08 PM

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.

मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराडबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. निवडणुकीपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी भेट घेतली असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले. तर धनंजय मुंडे यांच्यासोबत वाल्मिक कराड देखील होता. हे दोघेही उशिरापर्यंत भेटीसाठी थांबलेले होते, असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडेंसोबत वाल्मिक कराड भेटीला आल्याचा पूर्ण किस्सा सांगितला आहे. ‘नीच वृत्तीची टोळी असेल हे आम्हाला काय माहिती? मला भेटण्यासाठी 8 दिवसांपासून फोन येत होते. मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड रात्री 2 वाजता माझ्या भेटीसाठी आले होते. ते बराच वेळ बाहेर थांबले होते म्हणून मी त्यांना भेटलो. त्यावेळी मुंडेंनी कराड आणि आणखी एकाची ओळख करून दिली. मग ते आत आले. त्यावेळी मी त्यांना हर्व्हेस्टरचे पैसे बुडवणारा हेच का असं त्यांना म्हटलं होतं. ते येण्याआधी मी झोपलो होतो. पण किती वेळ थांबवणार म्हणून मी भेटलो. त्यांनी लक्ष राहुद्या असं म्हटलं. जातांना ते पाया पडले’, असं म्हणत मोठा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला. बघा नेमकं काय म्हणाले?

Published on: Feb 03, 2025 02:08 PM