Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, जरांगे सरकारवर बरसले, थेट नेते-मंत्र्यांची नाव घेत घणाघात

Manoj Jarange Patil : शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत, जरांगे सरकारवर बरसले, थेट नेते-मंत्र्यांची नाव घेत घणाघात

| Updated on: Oct 03, 2025 | 10:39 AM

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनीही प्रति गुंठा ८५ रुपये मदतीला नकार दिला. निवडणूक काळात उद्योजकांकडून पैसे घेतले जातात, तर आता शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी धनाढ्य लोकांकडून का नाही, असा सवाल जरांगे पाटलांनी केला.

मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या मदतीवरून मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे कापू नयेत अशी मागणी त्यांनी केली. निवडणूक काळात उद्योजकांकडून पैसे गोळा करता येतात, तर आता शेतकऱ्यांसाठी मदत उभी करण्यात सरकारला अडचण का येते, असा सवाल जरांगे पाटलांनी केला. त्यांनी धनाढ्य उद्योगपती आणि नेत्यांकडून मदत घेण्याची सूचना केली.

दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातल्या करमोडी ग्रामपंचायतीने राज्य सरकारने जाहीर केलेली प्रति गुंठा ८५ रुपये (८,५०० रुपये प्रति एकर) मदत तुटपुंजी ठरवत ती नाकारली आहे. शेतकऱ्यांचे सोयाबीन, ऊस, हळद आणि कापूस यांसारखी पिके पूर्णपणे वाहून गेली आहेत. पिके साफ करण्यासाठी येणारा खर्चही या मदतीत भरून निघणार नसल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे, त्यामुळे ही मदत शेतकऱ्यांची चेष्टा असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Published on: Oct 03, 2025 10:39 AM