आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; जरांगे पाटलांचा निर्धार कायम

आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; जरांगे पाटलांचा निर्धार कायम

| Updated on: Aug 24, 2025 | 4:05 PM

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी बीड येथे एका बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आणि मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा दिला.

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. येत्या 29 ऑगस्टला सरकारच्या विरोधात जरांगे यांच्यासह समर्थकांकडून मुंबईत धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी आज बीड जिल्ह्यात मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी इशारा बैठक घेतली. यावेळी मराठा समाजासह जरांगे यांच्या समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जरांगे यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र टीका करताना मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांनी नांदेड येथे एक मराठा समाजातील व्यक्ती जिल्हाधिकारी झाल्याचा दाखला देत म्हटले, थोडं थांबा, एक-दोन वर्षांत प्रत्येक कार्यालयात आमची मुले असतील. आमची मुलं खूप हुशार आहेत, रात्रभर अभ्यास करतात, असे ते म्हणाले.

Published on: Aug 24, 2025 04:05 PM