राजकारणात मला हलक्यात…, मनोज जरांगे पाटील यांचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा काय?

राजकारणात मला हलक्यात…, मनोज जरांगे पाटील यांचा सर्वपक्षीय नेत्यांना इशारा काय?

| Updated on: Mar 27, 2024 | 3:05 PM

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मला हलक्यात घेतलं होतं मात्र राजकारणात मला हलक्यात घेऊ नका, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी असं वक्तव्य करत राजकारणातील सर्वपक्षीय नेत्यांना हा इशारा दिला आहे.

सराटी येथे २४ तारखेला झालेल्या बैठकीत मराठा समाजाने राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, गावागावात बैठका घेणं सुरू असून रणनिती आखली जात आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मला हलक्यात घेतलं होतं मात्र राजकारणात मला हलक्यात घेऊ नका, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी असं वक्तव्य करत राजकारणातील सर्वपक्षीय नेत्यांना हा इशारा दिला आहे. ‘कशाला राजकारण्यांचे पाया पडतात. हेच तुमच्यावर गुन्हे दाखल करणार, मागणारे तुम्ही, निवडणून देणारे तुम्ही…त्यापेक्षा तुम्ही देणारे बना…माझा काहीच स्वार्थ नाही. मी एकदा शब्द दिला की दिला…३० तारखेनंतर सगळं ठरणार…मराठा समाजाचं मत अहवाल आल्यानंतर ३० तारखेला आम्ही आमची भूमिका सांगू’, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Published on: Mar 27, 2024 03:05 PM