Pakistan : ‘अगर भारत के खिलाफ जंग छिड़ी तो…’, मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन तर बघा

Pakistan : ‘अगर भारत के खिलाफ जंग छिड़ी तो…’, मौलवींचा सवाल अन् पाकच्या नागरिकांची अजब रिअ‍ॅक्शन तर बघा

| Updated on: May 05, 2025 | 3:37 PM

इस्लामाबाद येथील लाल मशिदीतील या व्हिडिओमुळे पाकिस्तानमध्ये एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, जिथे लोक आता उघडपणे भारताविरुद्ध कोणत्याही लष्करी कारवाईपासून दूर राहू इच्छित असल्याचे पाहायला मिळतंय.

पाकिस्तानमध्ये जितका मुस्लिमांचा छळ होतो, तितका भारतातही होत नाही, असं वक्तव्य पाकिस्तानमधील एका मौलवीने केल्याचे समोर आले आहे. इतकंच नाहीतर यावेळी केलेल्या आणखी काही वक्तव्यानं मौलवींनी पाकिस्तानलाच घरचा आहेर दिल्याचे पाहायला मिळाले. ‘अगर जंग छिड़ी तो किसके साथ खड़े होंगे आप?’ म्हणजेच भारतासोबत पाकिस्तानचं युद्ध झालं तर लढायला कोण-कोण जाणार? असा सवाल देखील या मौलवीने केला. यानंतर मशिदीत उपस्थित असलेल्या एकाही पाकिस्तानी नागरिकांने हात उंचावला नाही, असं मौलवींनी म्हटलंय. इस्लामाबाद येथील लाल मशिदीत मौलवींनी हा संवाद सध्या व्हायरल होतोय.

यावरून असे लक्षात येते की, पाकिस्तानमधील परिस्थिती अधिक गंभीर होत चालली आहे, विशेषतः जेव्हा इस्लामाबादमधील लाल मशिदीतील एका मौलवीने ‘भारताविरुद्धच्या युद्धात तुम्ही पाकिस्तानला पाठिंबा द्याल का?’ असा प्रश्न विचारला. या प्रश्नानंतर, तिथे उपस्थित असलेले लोक गप्प राहिले आणि कोणीही हात वर केले नाहीत, असं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

Published on: May 05, 2025 03:23 PM