गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात 2 गटामध्ये तुफान दगडफेक

| Updated on: Mar 29, 2023 | 8:29 AM

जळगाव शहरापासून जवळच असलेल्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता दोन गटात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीतून दंगल उसळली

Follow us on

जळगाव : पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी गावात 2 गटामध्ये तुफान दगडफेक झाल्याचे समोर आले आहे. दोन गटात तुफान दगडफेक झाल्याने पाळधी गावात सध्या तणावाचे वातावरण आहे. यावेळी अज्ञात जमावाकडून पाळधी पोलीस स्टेशनवरही दगडफेक करण्यात आली. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जळगाव शहरापासून जवळच असलेल्या धरणगाव तालुक्यातील पाळधी येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता दोन गटात वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीतून दंगल उसळली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले. घटनेत एक पोलीस कर्मचाऱ्यासह दोन तरुण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेत झालेल्या दगडफेकीत तीन चारचाकी आणि एका पोलीस वाहनाच्या काचा फोडण्यात आल्या आहेत.