Uday Samant : शिंदेंना तुमच्या गळ्यात हार घालण्याची संधी कधी देणार? हे लवकर… चंद्रहार पाटलांना उदय सामंतांची खुली ऑफर
सांगलीच्या भाळवणी या ठिकाणी पैलवान चंद्रहार पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत असताना उदय सामंतांनी काय दिली ऑफर?
सांगली दौऱ्यावर असताना शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे गटाचे नेते, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांना थेट पक्षात येण्याची खुली ऑफर दिली. आमच्या गळ्यात हार घालताय, पण एकनाथ शिंदे यांच्या हातून गळ्यात कधी हार घालायचा? हे लवकर ठरवा, अशा शब्दात उदय सामंत यांनी चंद्रहार पाटलांना शिवसेना शिंदे गटात येण्याची जाहीर ऑफर दिली आहे. चंद्रहार पाटलांची ताकद मोठी आहे, पण ते जिथे आहेत तिथे त्यांच्या ताकतीचा उपयोग झाला नाही आणि कधी होणारही नाही, असा टोला देखील मंत्री सामंत यांनी लगावला आहे.
गेल्या काही दिवसांपासून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार, अशी चर्चा सुरू होती, या सर्व पार्श्वभूमीवर चंद्राहार पाटील यांच्या भाळवणी गावांमध्ये मंत्री उदय सामंत त्यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामुळे चंद्रहार पाटील हे उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात जाणार, अशा चर्चांना पुन्हा उधान आले आहे.
