Suresh Dhas News : ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

Suresh Dhas News : ऐवढा मोठा तो नाही, जेवढा दाखवला गेला..; खोक्याबद्दल धसांच मोठं विधान

| Updated on: Mar 16, 2025 | 6:18 PM

MLA Suresh Dhas On Satish Bhosale : आमदार सुरेश धस यांनी अंजज शिरूर कासार गावात जात त्यांचा कार्यकर्ता आणि आरोपी असलेल्या सतीश भोसले याच्या कुटुंबाची भेट घेतली. यावेळी त्यांनी खोक्याबद्दल मोठं विधान केलं आहे.

आमदार सुरेश धस यांनी आज आरोपी खोक्या उर्फ सतीश भोसले याच्या कुटुंबाची भेट घेतली. शिरूर कासार येथे असलेल्या खोक्याच्या घरावर वन विभागाने तोडक कारवाई केली. ही कारवाई कोणतीही नोटिस न देता करण्यात आली असल्याचं कुटुंबाचं म्हणण आहे. त्यानंतर काही अज्ञात इसमांनी त्याच्या कुटुंबाला मारहाण करून घर जाळल्याचा प्रकार देखील घडल्याने या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज आमदार सुरेश धस यांनी खोक्याच्या कुटुंबाची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना म्हंटलं की, वन विभागाने तोडक कारवाई करताना कोणतीही नोटिस दिलेली नाही. मिडियाने खोक्याला किती मोठा गुंड केला, किती मोठा पैसेवाला केला ते तुम्हीच बघा. नोटिस न देता कोणत्या नियमाने ही घर तोडण्याची कारवाई झाली हे वन विभागाने सांगावं, असंही धस यांनी म्हंटलं आहे.

Published on: Mar 16, 2025 06:18 PM