राज ठाकरे उद्या लिलावती रुग्णालयात दाखल होणार

राज ठाकरे उद्या लिलावती रुग्णालयात दाखल होणार

| Updated on: May 30, 2022 | 2:53 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भोंग्यांच्या विषयावरुन त्यांनी थेट अल्टिमेटम दिला होता.

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. भोंग्यांच्या विषयावरुन त्यांनी थेट अल्टिमेटम दिला होता. राज्य सरकारवर खासकरुन शिवसेनेवर त्यांनी बरीच टीका केली आहे. येत्या पाच जूनला ते अयोध्येला जाणार होते. पण मध्येच त्यांनी हा दौरा स्थगित केला. त्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका सुद्धा झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या लिलावती रुग्णालयात दाखल होणार आहेत. 1 जून रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. पायाच दुखण वाढल्यामुळे ही शस्त्रक्रिया करण्यात येईल. स्वत: राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती.

Published on: May 30, 2022 02:53 PM