दोन वर्षानंतर मनसेचा मुंबईत पाडवा मेळावा

| Updated on: Mar 23, 2022 | 12:51 PM

कोरोना संकटानंतर दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मनसेचा (mns) मुंबईत पाडव्या निमित्ताने मेळावा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने या मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे.

Follow us on

मुंबई: कोरोना संकटानंतर दोन वर्षानंतर पहिल्यांदाच मनसेचा (mns) मुंबईत पाडव्या निमित्ताने मेळावा होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा मेळावा होत असल्याने या मेळाव्याच्या निमित्ताने मनसे प्रचंड शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यता आहे. तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे महापालिका निवडणुकीचं (bmc) रणशिंग फुंकण्याचीही चिन्हे आहेत. राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत त्यांची तोफ पाडवा मेळाव्यात धडाडणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यामुळे राज यांच्या या भाषणाची सर्वांनाच उत्सुकता लागली असून या मेळाव्यात राज यांच्या निशाण्यावर कोण असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसे नेत्यांनी हा मेळावा आमच्यासाठी एक उत्सवच असल्याचं आधीच स्पष्ट केल्याने हा मेळावा अतिभव्य होणार असल्याचे आधीच संकेत मिळत आहेत.