Gunaratna Sadavarte : ‘…मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो’, मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची, ऑडिओ व्हायरल

Gunaratna Sadavarte : ‘…मग तुझ्या राज ठाकरेला सांगतो’, मनसे नेता अन् सदावर्तेंमध्ये बाचाबाची, ऑडिओ व्हायरल

| Updated on: Apr 05, 2025 | 11:31 AM

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज ठाकरेंनी मराठी भाषेवरून आदेश दिल्यानंतर मनसैनिकांनी बँकांमध्ये जात अधिकाऱ्यांना १५ दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

‘कोणत्याही कष्टकऱ्यांनी राज ठाकरे यांच्या गुंडाना घाबरण्याचे कारण नाही. कारण संविधानामध्ये बोलण्याचा आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे.’, असं गुणरत्न सदावर्ते यांनी म्हटले. पुढे ते असेही म्हणाले, संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे मेरी मर्जी… मराठी, हिंदी, इंग्रजी कोणत्याही भाषेत बोलेन माझी मर्जी… भाषेवर कोणीही प्रतिबंध आणू शकणार नाही, असे भाष्य करत गुणरत्न सदावर्ते यांनी मनसेच्या खळखट्याकचा दिलेला इशारा आणि मराठी भाषेवरून राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेवरून निशाणा साधला आहे. अशातच मनसे प्रवक्ते योगेश खैरे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यात बाचाबाची झाल्याचे समोर आले आहे. योगेश खैरे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यातील एक कॉल रेकॉर्डिंग सध्या व्हायरल होत आहे. मात्र टीव्ही ९ मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही.

Published on: Apr 05, 2025 11:24 AM