Thackeray Brothers : ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन! मनसे आणि ठाकरेसेनेचं एकत्रित आंदोलन

Thackeray Brothers : ठाकरे बंधूंच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन! मनसे आणि ठाकरेसेनेचं एकत्रित आंदोलन

| Updated on: Jun 18, 2025 | 1:36 PM

MNS-Shivsena UBT Protest : मुंबईत आज चुनाभट्टी येथे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेकडून एकत्रित आंदोलन करण्यात येणार आहे.

मुंबईत आज उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांचं एकत्र आंदोलन होणार आहे. मनसे – ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांची नोटिस आलेली आहे. आज सकाळी हे आंदोलन होण्यापूर्वीच या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटिस मिळाली आहे. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधात मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन करण्यात येणार आहे. चुनाभट्टी इथल्या प्रादेशिक कामगार आयुक्त कार्यालयासमोर हे आंदोलन असणार आहे. मात्र त्याआधीच दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटिस आलेल्या आहेत.

दरम्यान, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधु पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चा एकीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेट्. त्याबद्दल अद्यापही कोणती स्पष्ट भूमिका राज ठाकरेंनी मांडलेली नसली तरी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र मनोमिलन होताना दिसून येत आहे. त्यातच आज मनसे आणि ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं हे एकत्र आंदोलन असणार आहे.

Published on: Jun 18, 2025 01:36 PM