India Pakistan War : मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, ….यापुढे तसं कृत्य युद्ध मानलं जाणार
गेल्या ३ दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. पाकिस्तान भारतावर वेगाने हल्ला करत आहे. भारत सरकारचे म्हणणे आहे की त्यांच्याकडून करण्यात येणारी कारवाई पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून आहे. अशातच भारत सरकारने हा मोठा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव चांगलाच वाढला असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ या कारवाईनंतर पाकिस्तान देखील भारतावर सातत्याने हल्ले करण्याचा प्रयत्न करत आहे. पाकिस्तानने देशातील २६ ठिकाणी हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आली. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. मोदी सरकारने दहशतवादाविरोधात एक मोठा निर्णय घेतला आहे. भारताने दहशतवादाविरुद्ध एक कठोर भूमिका घेत यापुढे भविष्यात कोणतीही दहशतवादी कारवाई ही भारताविरुद्ध युद्ध मानलं जाईल, असं केंद्र सरकारशी संबंधित सूत्रांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात कोणतीही दहशतवादी कारवाई पाकिस्तानकडून करण्यात आल्यास ती भारताविरुद्ध युद्ध कारवाई मानली जाईल आणि त्याला प्रत्युत्तर देखील त्याच पद्धतीने दिले जाईल.
Published on: May 10, 2025 05:33 PM
