Mono Rail : मोनो रेल कलंडली अन् प्रवाशांना धडकी, पाऊण तास एकाच जागी, AC बंद लोकं अडकली

Mono Rail : मोनो रेल कलंडली अन् प्रवाशांना धडकी, पाऊण तास एकाच जागी, AC बंद लोकं अडकली

| Updated on: Aug 19, 2025 | 7:42 PM

चेंबूर आणि भक्तीपार्कदरम्यान ही मोनोरेल थांबवण्यात आलेली आहे. या मोनोरेलमध्ये अनेक वृद्ध, महिला, लहान मुलं असून प्रवाशांचा श्वास गुदरमत असल्याची माहिती मिळतेय.

मुंबई गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने त्याचा फटका मुंबईची लाईफ लाईन लोकल ट्रेनला बसला. मध्य रेल्वे, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल ट्रेन विस्कळीत झाल्याने प्रवाशांना मोठा फटका बसला असे असताना आणखी एक बातमी समोर येत आहे. चेंबूर-भक्तीपार्कदरम्यानची मोनोरेल मध्येच थांबली इतकंच नाहीतर ही मोनो रेल अचानक काहिशी कलंडली त्यामुळे प्रवाशांना धडकी भरली. लोकल सेवा विस्कळीत झाल्याने काही प्रवाशांनी मोनो रेल हा पर्याय निवडल्याने त्यात प्रवाशांची मोठी गर्दी होती. अशातच मोनो रेल चेंबूर ते भक्ती पार्क दरम्यान ठप्प झाली. पाऊन तास एकाच जागी मोनो रेल उभी असल्याने प्रवाशांना कारण कळायला काही मार्ग नव्हते. दरम्यान, तांत्रिक बिघाडामुळे बंद पडलेल्या मोनो रेल्वेतून प्रवाश्यांना बाहेर काढण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे मुंबई अग्निशमन दलाने मदत कार्य सुरु केले आहे. तसेच महानगरपालिकेचे वैद्यकीय पथक रवाना करण्यात आले आहे. नजीकच्या महानगरपालिका रुग्णालयास सुसज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Published on: Aug 19, 2025 07:42 PM