कोरोनाविरुद्धच्या लढाईत हा तरुण बजावतोय महत्वाची भूमिका, लसीकरणासाठी मोफत टॅक्सी सेवा

| Updated on: Apr 22, 2021 | 3:22 PM

45 वर्षावरील मुंबईकरांसाठी चंदन साळुंखे या तरूणाने लसीकरण केद्रापर्यंत घेवून जाण्यासाठी टँक्सी आणि गाडीची मोफत सेवा दिली आहे. (Chandan Salunkhe Free taxi for vaccination)

Follow us on

मुंबई: कोरोना युद्ध जिंकायचं असल्यास लसीकरण हाचं एक पर्याय असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत आहेत. लॉकडाऊनच्याही काळात लसीकरणावर नागरिकांनी भर देण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे . कोरोना लसीकरण करण्यासाठी जाणाऱ्या 45 वर्षावरील मुंबईकरांसाठी चंदन साळुंखे या तरूणाने लसीकरण केद्रापर्यंत घेवून जाण्यासाठी टँक्सी आणि गाडीची मोफत सेवा दिली आहे. लाँकडाऊन असल्यामुळे नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी रूग्णालयात जाण्यासाठी अडचणीे येत होत्या त्यामुळेचं आपण ही सेवा सुरू केल्याचं चंदन साळुंखे सांगतात. पोद्दार , हिंदुजा , केईएम आणि वाडीया रूग्णालयात रूग्णांना लसीकरणासाठी जाण्यास दिली पुरवली जातेय सेवा.

आतापर्यंत 300 च्या वर नागरिकांना त्यांनी लसीकरण केद्रापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं आहे . ही सेवा येत्या 30 एप्रिलपर्यंत सुरू राहणार असल्याचं तरूण चंदन साळुंखे सांगतो. बाळासाहेबांच्या समाकारणातून प्रेरणा घेत समाजाचं ऋण फेडण्यासाठी हा उपक्रम आपण राबवत असल्यास चंदन सांगतो . या त्यांच्या कार्याचं लसीकरणासाठी जाणार्या नागरिकांनीही कौतुक .तुम्ही दक्षिण मुंबईत राहत असाल आणि तुम्हाला पोद्दार केईएम,हिंदुजा,वाडीया येथे लसीकरणासाठी जायचं असेल तर तुम्ही चंदन साळुंखे यांच्याशी संपर्क करून मोफत टँक्सी सेवेचा लाभ घेवू शकता.