Mumbai Ganpati Visarjan 2025 :  दाटीवाटी, इवलीशी गल्ली… ‘काळाचौकाचा महागणपती’ बघा कसा झाला मार्गस्थ!

Mumbai Ganpati Visarjan 2025 : दाटीवाटी, इवलीशी गल्ली… ‘काळाचौकाचा महागणपती’ बघा कसा झाला मार्गस्थ!

| Updated on: Sep 06, 2025 | 3:12 PM

लालबागच्या राजाच्या विसर्जनाची शाही मिरवणूक मोठ्या उत्साहात पुढे सरकरत असताना प्रत्येक मार्गावर बाप्पाचं भव्य स्वागत केलं जात आहे. अशातच काळाचौकीचा महागणपती देखील विसर्जनासाठी निघालाय

अनंत चतुर्दशी २०२५ च्या निमित्ताने मुंबई आणि पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहाने होताना दिसताय. मुंबईतील गणेशोत्सव हा केवळ मुंबईतच नव्हे तर राज्यभरात आकर्षणाचा विषय असतो. सार्वजनिक गणेश मंडळाचे केवळ देखावेच नाहीतर तर बाप्पाच्या उंचच उंच मुर्त्या देखील सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आज दहा दिवसांच्या बाप्पाचे विसर्जन होत आहे. सकाळपासूनच मुंबईचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा विसर्जन मिरवणुकीसाठी मार्गस्थ झाले आहेत. मात्र अशातच मुंबईतील काळाचौकीच्या महागणपतीचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. काळाचौकीचा महागणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होताना अगदी दाटी वाटी आणि कमी जागा असलेल्या जागेतून बाहेर पडताना दिसतोय. बाप्पाची लीलाच म्हणावी की बाप्पा सुरक्षितरित्या इवल्याशा जागेतून विसर्जनासाठी बाहेर येतो. हाच क्षण भक्त आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेऱ्याच कैद करताना दिसताय.

Published on: Sep 06, 2025 02:58 PM