Mumbai Cha Raja Visarjan 2025 : ढोल-ताशा, गुलाल अन् पहिला मान… ‘मुंबईचा राजा’ मार्गस्थ, बघा विसर्जनाचा थाट

Mumbai Cha Raja Visarjan 2025 : ढोल-ताशा, गुलाल अन् पहिला मान… ‘मुंबईचा राजा’ मार्गस्थ, बघा विसर्जनाचा थाट

| Updated on: Sep 06, 2025 | 1:53 PM

२०२५ च्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबई आणि पुणे शहरांमध्ये गणेश विसर्जन मिरवणुका मोठ्या उत्साहाने आणि भावभक्तीने मार्गस्थ झाल्यात. लाखो भक्तांनी या उत्सवात सक्रिय सहभाग घेतल्याचे पाहायला मिळतंय

लालबागच्या राजाचं विसर्जन मुंबई शहरातील एक महत्त्वाचा आणि लक्षवेधून घेणारा सोहळा मानला जातो. या वर्षीच्या गणेशोत्सवातही लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडतेय. चिंचपोकळीच्या पुलापासून गिरगाव चौपाटीपर्यंतच्या मार्गावर हजारो भाविक लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी करत असतात. राजाच्या मिरवणुकीत विविध जाती-धर्माचे लोक सहभागी होत असतात. यावेळी फुलांचा वर्षाव, भक्तीमय गीते आणि जयघोष यामुळे मुंबईतील विसर्जन मिरवणुकीतील वातावरण आनंदमय झाल्याचे दिसतंय.. लालबागच्या राजाचं हे भव्य स्वागत आणि विसर्जन लाखो लोकांसाठी श्रद्धेचे आणि आनंदाचे प्रसंग असतात. तर दुसरीकडे चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा यांची मिरवणूक देखील तितकीच गाजतेय. चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईचा राजा हे दोन्ही बाप्पा देखील विसर्जनासाठी मार्गस्थ झालेत.

Published on: Sep 06, 2025 01:53 PM