Ganpati Visarjan 2025 :  कंठ दाटला, डोळे पाणावले.. ‘लालबागच्या राजा’ला निरोप देताना मुर्तिकार संतोष कांबळी भावूक

Ganpati Visarjan 2025 : कंठ दाटला, डोळे पाणावले.. ‘लालबागच्या राजा’ला निरोप देताना मुर्तिकार संतोष कांबळी भावूक

| Updated on: Sep 06, 2025 | 11:41 AM

मुंबईतील गणेश गल्लीचा राजा, तेजूकाया हे बाप्पा विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहेत. हजारो भक्त बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झाले आहेत. अशातच लालबागचा राजा देखील विसर्जनासाठी सज्ज झालाय.

गणेशोत्सव म्हटलं की मुंबईतील गणपतीची चर्चा ही होतेच. अशातच मुंबईचा राजा अर्थात मुंबईतील गणपती मंडळापैकी प्रमुख आकर्षण आणि नवसाला पावणारा अशी ख्याती असणारा लालबागचा राजाची शान ही नेहमीच मुंबईत पाहायला मिळते. केवळ मुंबईच नाहीतर राज्यभरातून, परदेशातून देखील भक्त राज्याच्या चरणी लीन होण्यासाठी येत असतात. गेले दहा दिवस मनोभावे पूजा, आरती केल्यानंतर जो क्षण नको तो क्षण येऊन ठेपला आहे. करोडो भक्त लालबागच्या राजाचा आशीर्वाद घेण्यासाठी पहिल्या दिवसांपासून दाखल होत असतात. मात्र हा लालबागचा राजा ज्यांच्या हाताने घडवला जातो. ते मुर्तिकार संतोष कांबळी देखील लालबागच्या राजाला अखेरचा निरोप देताना स्वतः भारावलेले पाहायला मिळताय. लालबागच्या राजाची मूर्ती घडवण्याच्या पहिल्या दिवसापासून ते आज निरोपाच्या क्षणापर्यंत आपल्या भावना व्यक्त करत असताना त्यांचा देखील कंठ दाटून आला आणि डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले.

Published on: Sep 06, 2025 11:31 AM