Mumbai Weather : मुंबईसह उपनगरात मुसळधार; हवामान खात्याकडून येलो अलर्ट जारी
Heavy Rainfall In Mumbai : हवामान खात्याकडून मुंबईत आज यलो अलर्ट देण्यात आला असून पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पुढील 2 ते 3 दिवस कोकणात देखील जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसंच मध्य महाराष्ट्रातल्या घाट भागात देखील पावसाचा अंदाज आहे. तर मुंबईसह उपनगरात आज पहाटेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. वसई, विरार, लोअर परेल भागात जोरदार पावसाच्या सरी बरसत असून नवी मुंबई भागात देखील मध्य रात्रीपासूनच पावसाने जोर धरला आहे.
हवामान खात्याकडून आज मुंबईला यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. कालपासून अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण बनून असतानाच मुंबईसह उपनगरात आज पहाटेपासूनच पाऊस सुरू झाला आहे. काही मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाच्या सरी बरसण्यास सुरवात झालेली आहे. जून महिन्यात म्हणावा तसा पाऊस बसरलेला नसला तरी जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. येत्या 2 ते 3 दिवसांत कोकणात देखील जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
