Megablock Update : उद्या लोकलनं प्रवास करताय? बघा कोणत्या मार्गावर कुठे कसा असणार ब्लॉक?

Megablock Update : उद्या लोकलनं प्रवास करताय? बघा कोणत्या मार्गावर कुठे कसा असणार ब्लॉक?

| Updated on: Jun 07, 2025 | 12:08 PM

मुंबईकरांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. उद्या रविवारी मुंबई लोकलने प्रवास करत असाल तर रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडा. बघा कुठे, कसा असणार मेगाब्लॉक?

मुंबईतील तिनही रेल्वे मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या तिनही मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवार दि. ०८ जून २०२५ रोजी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मुंबई डिव्हीजनमधील उपनगरीय मार्गांवर हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर पश्चिम रेल्वेच्या मीरारोड आणि भाईंदर स्थानकांदरम्यान मेट्रो मार्ग-९ च्या गर्डर लॉन्चिंगमुळे शनिवारी, रविवार आणि सोमवारी मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. येत्या रविवारी शनिवार, रविवार आणि सोमवारी मध्यरात्री १२. ४५ ते ३.१५ वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेवर ब्लॉक घेतला जाणार आहे. विद्याविहार आणि ठाणे स्थानकादरम्यान सकाळी ८ ते दुपारी दीडपर्यंत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर पनवेल आणि वाशी स्थानकादरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११ ते दुपारी चार पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

 

Published on: Jun 07, 2025 12:08 PM