Local Railway Mega Block : उद्या लोकलनं प्रवास करताय? कोणत्या मार्गावर कसा असणार ब्लॉक? जाणून घ्या
रेल्वेच्या तिनही मार्गावर उद्या रविवारी उपनगरीय मार्गावर दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तुम्ही उद्या लोकलने प्रवास करत असाल तर हा व्हिडीओ पाहूनच नियोजन करा
मुंबईकरांनो तुमच्यासाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. रेल्वेच्या तिनही मार्गावर उद्या रविवारी २२ जून रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर उद्या, रविवारी सकाळी ११ ते दुपारी ४ पर्यंत माटुंगा ते मुलुंड रेल्वे स्थानकादरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक कालावधीत विद्याविहार, कांजूर आणि नाहूर या रेल्वे स्थानकांवर लोकलची सेवा उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.
तर हार्बर मार्गावर देखील मेगाब्लॉक असून हार्बर मार्गावरील मानखुर्द-नेरूळदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ११ ते ४ या वेळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यान लोकल सेवा बंद असणार आहे. यासह पश्चिम रेल्वेवर बोरिवली आणि भाईंदर स्थानकांच्या दरम्यान शनिवारी रात्री ( दि. २१ आणि २२ च्या मध्यरात्री ) अप जलद मार्गावर रात्री ११.१५ ते मध्यरात्री २.४५ वा आणि डाऊन जलद मार्गावर रात्री १२.४५ ते सकाळी ०४.१५ वाजताच्या दरम्यान नाईट ब्लॉक घेण्यात येणार आहे.
