Mithi River Floods : मिठी नदीतून ‘तो’ वाचेल असं वाटलं पण बघताच क्षणी दिसेना झाला, बघा थरारक VIDEO

Mithi River Floods : मिठी नदीतून ‘तो’ वाचेल असं वाटलं पण बघताच क्षणी दिसेना झाला, बघा थरारक VIDEO

| Updated on: Aug 19, 2025 | 2:45 PM

मुंबईतील मिठी नदीची पातळीही वाढत आहे. यासंदर्भात पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याशी संपर्क केला आहे. त्यांनी यावर प्रशासनाचे यावर लक्ष आहे आणि नदीच्या दोन्ही बाजूच्या लोकांना सतर्क करण्यात आले आहे.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईकरांचं दैनंदिन जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच काल आणि आज असे दोन दिवस मुंबईला हवामान खात्याकडून रेड अलर्ट जारी करण्यात आलाय. सततच्या कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबईतील अनेक सखोल भागात पाणी भरण्यास सुरूवात झाली आहे. दादर, कुर्ला, घाटकोपर, सायन, किंग सर्कल अशा भागात पाणी साचल्याने वाहनं पाण्यात अडकून पडली आहेत तर नागरिकांना रस्त्यातून वाट काढण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान, हवामान विभागाकडून मुंबईला येत्या ४ तासांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आल्याने पुढील २४ तासांत अतिवृष्टीची शक्यताही वर्तवली जात आहे. मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने मिठी नदीची पाणीपातळी वाढली असून ती आता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. अशातच मिठी नदीच्या पाण्यातून एक व्यक्ती वाहून गेल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

Published on: Aug 19, 2025 02:38 PM