हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

| Updated on: Apr 06, 2023 | 11:25 AM

NCP MLA Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. पाहा व्हीडिओ...

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते, माजी मंत्री हसन मुश्रीफ यांची मागच्या काही दिवसांपासून ईडी चौकशी होत आहे. या प्रकरणी हसन मुश्रीफ यांच्या तीनही मुलांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागलंय.तर हसन मुश्नीफ प्रकरणात ईडीनं चंद्रकांत गायकवाडांची काल चौकशी केली. संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज साखर कारखान्या संदर्भात झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी चंद्रकांत गायकवाड यांची चौकशी झाली आहे. चंद्रकांत गायकवाड हे हसन मुश्रीफ यांचे व्यवसायिक भागीदार आहेत. त्यांचीही मागच्या काही दिवसांपासून चौकशी सुरू आहे.