Mumbai Rain Alert : मुंबईकरांनो सावध रहा.. पुढील 4 तास धोक्याचे… रेड अलर्ट अन् हवामान खात्याचा इशारा काय?
मुंबईतील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे, शाळा आणि महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. यासोबतच, खासगी कार्यालयांना देखील सुट्टी जाहीर करण्यात आली असून, कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस होत असल्याचे पाहायला मिळत आहे. कालपासूनच मुंबईत अतिमुसळधार पाऊस झाल्याने मुंबईतील सखल भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. तर मुंबईची लाईफ लाईन अशी ओळख असलेल्या मुंबई लोकल ट्रेनला देखील या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला होता. मुंबईत होत असणाऱ्या पावसामुळे रेल्वे रूळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. तर आठवड्याच्या सुरूवातीलाच रेल्वेची वाहतूक कोलमडल्याने प्रवाशांचा मोठा खोळंबा झाला
दरम्यान, काल पावसाचा जोर लक्षात घेता प्रशासनाकडून मुंबईतील शाळा-महाविद्यालयातील दुसऱ्या सत्रातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर कऱण्यात आली होती. तर आवश्यकता असेल तर घराबाहेर पडा अन्यथा घरातच सुरक्षित राहण्याचे आवाहन नागरिकांना महापालिकेकडून कऱण्यात आले होते. आज हवामान खात्याने मुंबईला रेड अलर्ट जारी केला असून शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना सुट्टी जाहीर केली आहे. अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने मुंबईसाठी पुढील चार तास अतिशय महत्त्वाचे आणि धोक्याचे असल्याचे सांगितले आहे.
