Mumbai Weather News : मुंबईकरांनो आज, उद्या तारांबळ उडणार, कसा होणार पाऊस? हवामान खात्याचा अलर्ट काय?

Mumbai Weather News : मुंबईकरांनो आज, उद्या तारांबळ उडणार, कसा होणार पाऊस? हवामान खात्याचा अलर्ट काय?

| Updated on: Jun 15, 2025 | 10:19 AM

आज मुंबईला येलो अलर्ट हवामान खात्याकडून जारी करण्यात आला असून ठाणे, पालघर , रायगड, सिंधुदुर्गला ऑरेंज अलर्ट जारी केलाय.  मुंबईत सकाळी देखील पाऊस असल्याने रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळाला तर पावसाच्या रिमझिममुळे नागरिकांचा मॉर्निंग वॉक हुकल्याचे पाहायला मिळाले.

मुंबईसह उपनगरात आज सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. तर मुंबईत रात्रभर रिमझिम पाऊस सुरू असल्याने उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना काहिसा दिलासा मिळाला आहे. मुंबई आणि उपनगरासह ठाणे, कल्याण-डोंबिवली, वसई, विरारसह पालघर परिसरात देखील पाऊस सुरू आहे. रविवारी पहाटेपासूनच पावसाने हजेरी लावली असल्याने सकाळच्या वेळेत कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. सध्या मुंबई आणि उपनगरात पडणाऱ्या पावसाचा वाहतुकीवर कोणताही परिणाम झाला नसून, तिन्ही मार्गावरील लोकल सेवा आणि शहरातील वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती आहे.

मुंबईत आज सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. आज आणि उद्या मुंबईला हवामान खात्याकडून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ठाणे, पालघर , रायगड, सिंधुदुर्गला आज ऑरेंज अलर्ट आणि उद्या यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यासह मुंबई आणि उपनगराला मध्यम ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.

 

 

Published on: Jun 15, 2025 10:19 AM