Kandivali Rain News : कांदिवलीत जोरदार पावसाला सुरुवात; रेल्वे बरोबरच रस्ते वाहतुकीवर परिणाम

Kandivali Rain News : कांदिवलीत जोरदार पावसाला सुरुवात; रेल्वे बरोबरच रस्ते वाहतुकीवर परिणाम

| Updated on: May 28, 2025 | 3:54 PM

Mumbai Weather News : मुंबईत जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. पुढील काही तासांसाठी मुसळधार पावसाचा अंदाज असल्याचं हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

कांदिवलीमध्ये देखील जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. खरंतर काल दुपारपासून पावसाने काहीशी उघडीप दिलेली होती. मात्र आज पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. मुंबईतील अनेक भागात पाऊस सुरू झालेला आहे.

आज सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण बघायला मिळालं होतं. त्यानंतर आता काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. कांदिवलीमध्ये देखील जोरदार पाऊस बरसत आहे. या पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर बघायला मिळत आहे. काही मिनिटं उशिराने लोकल रेल्वेची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे घराबाहेर पडलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. पुढील काही तासांसाठी हा पाऊस असाच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, या पावसाने रस्ते वाहतूक देखील काहीशी मंदावली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी बघायला मिळत आहे.

Published on: May 28, 2025 03:54 PM