Munna Yadav | नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

Munna Yadav | नवाब मलिक यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार

| Edited By: | Updated on: Nov 10, 2021 | 12:50 PM

मी गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात आहे. भाजपचा 10 वर्षे नगरसेवक होतो. त्यामुळं माझ्यावर काही राजकीय गुन्हे आहेत. याचा अर्थ मी काही गुंड नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे मुन्ना यादव यांनी दिले.

नागपूर : मी गेल्या 25 वर्षांपासून राजकारणात आहे. भाजपचा 10 वर्षे नगरसेवक होतो. त्यामुळं माझ्यावर काही राजकीय गुन्हे आहेत. याचा अर्थ मी काही गुंड नाही, असे स्पष्टीकरण भाजपचे मुन्ना यादव यांनी दिले. टीव्ही 9 मराठीशी ते बोलत होते.

चौकशीला सामोरे जाण्यास तयार

मुन्ना यादव यांच्यावर गुन्हे दाखल असताना अशा गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मंत्रीपदाचा दर्जा असलेलं पद कस दिलं, असा आरोप नवाब मलिक यांनी केलाय. त्यावर स्पष्टीकरण देताना मुन्ना यादव म्हणाले, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मला बांधकाम कामगार मंडळाचे अध्यक्ष केले. कारण मी बऱ्याच वर्षांपासून राजकारणात आहे. माझ्यावर असलेले गुन्हे हे राजकीय आहेत. निवडणुकीच्या वादातून हे गुन्हे विरोधकांनी माझ्याविरोधात दाखल केले आहेत. आंदोलन करीत असताना राजकीय गुन्हे दाखल होतात. माझ्याविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचे गुन्हे नाहीत. याप्रकरणी आधीच माझी चौकशी झाली आहे.