महाविकास आघाडी फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण…; बाळासाहेब थोरात यांचा विरोधकांना इशारा

महाविकास आघाडी फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो, पण…; बाळासाहेब थोरात यांचा विरोधकांना इशारा

| Edited By: | Updated on: Apr 16, 2023 | 12:38 PM

Balasaheb Thorat : महाविकास आघाडीवज्रमूठ सभेआधी बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया, बाळासाहेब थोरात यांचा विरोधकांना इशारा; म्हणाले...

नागपूर : नागपुरात महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होतेय. या सभेआधी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.”राज्यात आमची वज्रमुठ भक्कम आहे. त्यामुळे महाविकास आघाडी फोडण्याचा प्रयत्न होऊ शकतो. मात्र आम्ही एकत्र आहोत, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. लोकसभेला आमच्या जवळपास 40 जागा आणि विधानसभेलाही चांगला निकाल लागेल. राज्यात जे घडलं ते लोकांना आवडलं नाही. त्याचा निवडणुकीच्या निकालात परिणाम दिसेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत. आजच्या सभेला गर्दी होईल. राष्ट्रवादीची वेगळी भूमिका असेल असं मला तरी वाटतं नाही. कारण आम्ही तिनही पक्ष एकत्र आहोत. अजित पवार तर नागपूरात आले आहेत, असंही थोरात म्हणालेत.

Published on: Apr 16, 2023 12:38 PM