Namdeo Shastri : धनंजय मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी का केलं असं आवाहन?

Namdeo Shastri : धनंजय मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी का केलं असं आवाहन?

| Updated on: Apr 17, 2025 | 4:25 PM

Namdeo Shastri On Dhananjay Munde : संत भगवानबाबा गडाचा नारळी सप्ताह आज बीडच्या शिरूर कासार येथील पिंपळगावमध्ये पार पडत आहे. यावेळी बोलताना नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे.

धनंजय मुंडे यांच्यासाठी सर्वांनी मिळून प्रार्थना करा, असं नामदेव शास्त्री यांनी म्हंटलं आहे. धनंजय मुंडे यांच्या गालावरून वारं गेलं आहे. चांगली वाणी बंद पडलेली आहे, असंही नामदेव शास्त्री यांनी म्हंटलय. पाहिल्या पदावर येऊन मुंडे यांच्या हातून समाजकल्याण घडावं, असंही यावेळी बोलताना नामदेव शास्त्री म्हणालेत. बीडच्या शिरूर कासार येथे आज संत भगवानबाबा गडाचा नारळी सप्ताह होत आहे. यावेळी आपल्या कीर्तनातून शास्त्री यांनी मुंडे यांच्यासाठी प्रार्थना करण्याचं आवाहन केलं आहे. या कार्यक्रमाला धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार होते. मात्र हेलिकॉप्टरला उड्डाण करण्यास परवानगी न मिळाल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला.

दरम्यान, या बद्दल बोलताना महंत नामदेव शास्त्री यांनी सांगितलं की, मला आपल्या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र धनंजय मुंडे यांचा फोन आला होता. ते या कार्यक्रमाला येणार होते. पण त्यांना तांत्रिक अडचणीमुळे येता आलं नाही. मला वाटतं त्यांच्या गालावरून जे वारं गेलं आहे. त्यासाठी सगल्याणी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, की एवढी चांगली वाणी जि बंद पडली आहे, ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाजकल्याण त्यांच्या हातून घडावं, असं आवाहन यावेळी नामदेव शास्त्री यांनी केलं आहे.

Published on: Apr 17, 2025 04:25 PM