नाना पटोले यांची शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका
सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
सलग दुसऱ्या दिवशी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची ईडीकडून चौकशी होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नवी मुंबईत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे. नाना पटोले, माजी मंत्री नसीम खान हे या आंदोलनात सहभागी झाले आहेत. “एकीकडे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाहीये. दुसरीकडे मतदारसंघातील कामं थांबली आहेत. दोन मंत्र्यांचं अपंग सरकार महाराष्ट्रात आहे. राज्यात पूरपरिस्थिती असताना सरकार मात्र सुस्त आहे”, अशी टीका यावेळी नाना पटोले यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.
Published on: Jul 27, 2022 03:45 PM
