Modi Mahakumbh Video : भगवं वस्त्र, हातात अन् गळ्यात रुद्राक्षाची माळ; मोदींचं प्रयागराज संगमात पवित्र स्नान, सूर्याला जल अर्पण

Modi Mahakumbh Video : भगवं वस्त्र, हातात अन् गळ्यात रुद्राक्षाची माळ; मोदींचं प्रयागराज संगमात पवित्र स्नान, सूर्याला जल अर्पण

| Updated on: Feb 05, 2025 | 11:57 AM

महाकुंभ पर्वानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथे संगमावर पवित्र स्नान केले. पंतप्रधानांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित आहेत.

आतापर्यंत देशभरातील साधू-संतांसह कोट्यवधी भाविकांनी महाकुंभ २०२५ मध्ये पवित्र स्नान केले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील बुधवारी प्रयागराजला दाखल झाल्याचे पाहायला मिळाले. महाकुंभ पर्वानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रयागराज येथे संगमावर पवित्र स्नान केले. पंतप्रधानांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित आहेत. हा पंतप्रधानांचा नियोजित कार्यक्रम असून ते प्रयागराजमध्ये साधारण अडीच तास असणार असल्याची माहिती मिळतेय. संगमात पवित्र स्नान करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मोटार बोटीने मुख्यमंत्री योगींसोबत संगमवर दाखल झालेत. यावेळी त्यांनी भगव्या रंगाचे कपडे घातले होते. त्यांच्या हातात आणि गळ्यात रुद्राक्षाची माळ असल्याचे पाहायला मिळाले. संगमावर दाखल झाल्यानंतर पंतप्रधान मोदींनी मंत्रोच्चारासह संगमात डुबकी मारली. संगममध्ये पवित्र स्नान केल्यानंतर, पंतप्रधानांनी सूर्याला अर्घ्य अर्पण केले. मोदींनी सुमारे ५ मिनिटे मंत्रांचा जप करत सूर्यपूजा केली. यानंतर पंतप्रधान संगम येथेच गंगेची पूजाही करणार आहेत. बघा व्हिडीओ…

Published on: Feb 05, 2025 11:52 AM