स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट

स्थानिकांना दिलासा! वाऱ्यांची दिशा बदलेली अन् मोठं संकट टळलं, आता या शहरावर ओढावलं ढगफुटीचं संकट

| Updated on: Jul 07, 2026 | 3:17 PM

मुंबई आणि पुण्यानंतर आता नाशिकमध्येही मुसळधार पावसाचा जोर वाढला आहे. हवामान विभागाने ढगफुटीचा इशारा दिल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून गोदावरी नदी परिसरातील टपऱ्या आणि दुकाने हटवण्यात आली आहेत. नाशिक शहरासह इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर भागात मागील काही तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.

पालघरमध्ये काल तब्बल 450 मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर हा पावसाचा भोवरा त्र्यंबकेश्वर आणि नाशिकच्या दिशेने सरकण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. त्यामुळे प्रशासनाने तातडीने खबरदारी घेत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते.

मात्र, आता हा भोवरा वेगळ्या दिशेला वळल्याची माहिती समोर आली आहे. हा भोवरा उत्तर दिशेला सुरतकडे आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले भागाकडे सरकल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नाशिकवरील अतिवृष्टीचे संकट काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तरीदेखील नाशिक, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरात मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Published on: Jul 07, 2026 3:17 PM
Follow Us