Nashik Rain : गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ; दुतोंड्या मारोती गुडघ्यापर्यंत पाण्यात
Nashik Weather Updates : गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नाशिकच्या गोदावरी धरणक्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. गोदावरी नदीत गंगापूर धरणातून 2 हजार 320 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू असल्याने धरणातून गोदावरी नदीच्या पत्रात हा विसर्ग करण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकमधील गोदावरी नदीची पाणी पातळी वाढली आहे.
राज्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. काल दुपारच्या सुमारास 2 हजार 320 क्युसेक वेगाने धरणातून गोदावरी नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे नाशिकच्या गोदावरी धरणाची पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे नदी पत्रातली अनेक मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहे. तर परिसरातील नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Published on: Jun 22, 2025 10:38 AM
