धक्कादायक! मविआच्या दोन नेत्यांना जीवे मारण्याची धमकी

धक्कादायक! मविआच्या दोन नेत्यांना जीवे मारण्याची धमकी

| Updated on: Jun 09, 2023 | 7:19 PM

राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. तर शरद पवार यांच्या धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यावरून राज्याच्या राजकारणात मोठ्या प्रमाणावर खळबळ उडाली आहे. तर शरद पवार यांच्या धमकी प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. शरद पवार यांना एका सोशल मीडिया अकाऊंटवरून “तुमचा दाभोळकर होणार,” अशी धमकी ट्विटरवरून देण्यात आली आहे. तर संजय राऊत आणि आमदार सुनील राऊत यांना “सकाळची पत्रकार परिषद बंद करा, अन्यथा गोळ्या घालू,” अशी धमकी देण्यात आली आहे. यावरून वातावरण तापलेलं आहे.

Published on: Jun 09, 2023 07:19 PM