Navi Mumbai : नवी मुंबईत भाजप कार्यालयाची पाटी गुजराती भाषेत; मनसे आक्रमक

Navi Mumbai : नवी मुंबईत भाजप कार्यालयाची पाटी गुजराती भाषेत; मनसे आक्रमक

| Updated on: Jul 21, 2025 | 11:59 AM

Navi Mumbai News : नवी मुंबईत भाजप कार्यालयाची पाटी पुन्हा एकदा गुजराती भाषेत असल्याचं बघायला मिळालं आहे.

नवी मुंबईत भाजप कार्यालयाची पाटी पुन्हा एकदा गुजराती भाषेत असल्याचं बघायला मिळालं आहे. मनसेच्या दणक्यानंतर मराठीमध्ये केलेली पाटी पुन्हा एकदा गुजरातीमध्ये करण्यात आली आहे. गुजरातमधील आमदार वीरेंद्रसिंग बहादूरसिंग जाडेजा यांच्या कार्यालयावरची ही पाटी आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नवी मुंबईच्या सीवूड्स येथे भाजपच्या गुजरातमधील आमदार वीरेंद्रसिंग बहादूरसिंग जाडेजा यांनी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाची पाटी पुन्हा गुजराती भाषेत लावल्याने मराठी माणसाचा अपमान केल्याचा आरोप समोर आला आहे. यापूर्वी मनसे, स्थानिक भाजप पदाधिकारी आणि मराठी समाजाच्या दबावानंतर 17 जुलै रोजी ही पाटी मराठीत बदलण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा ती गुजराती भाषेत लावण्यात आली असून, मराठीचा अंतर्भाव अत्यंत लहान अक्षरांत करण्यात आला आहे. मनसेने यावर आक्रमक भूमिका घेतली असून, मनसैनिकांनी नवी मुंबईतील एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली आहे.

Published on: Jul 21, 2025 11:59 AM