Mahayuti | गणेश नाईक यांच्या आरोपांवर एकनाथ शिंदेंचे पहिल्यांदाच भाष्य, नेमकं काय म्हणाले?
दोन दिवसांपूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नवी मुंबईतील भूखंडांवरून गंभीर आरोप केले होते. हे भूखंड बिल्डरांच्या फायद्यासाठी देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपण ज्या मंत्रिमंडळात आहोत, त्याच सरकारमधील नगरविकास खात्याने चुकीचे काम केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच सिडको आणि एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या विकासासाठी देण्यात येणारे भूखंड तात्काळ द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
दोन दिवसांपूर्वी मंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नवी मुंबईतील भूखंडांवरून गंभीर आरोप केले होते. हे भूखंड बिल्डरांच्या फायद्यासाठी देण्यात आल्याचा दावा करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपण ज्या मंत्रिमंडळात आहोत, त्याच सरकारमधील नगरविकास खात्याने चुकीचे काम केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. तसेच सिडको आणि एमआयडीसीकडून नवी मुंबई महापालिकेला जनतेच्या विकासासाठी देण्यात येणारे भूखंड तात्काळ द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली. गणेश नाईक यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी नाईक यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांच्यावर हल्लाबोल केला. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. गणेश नाईक यांना काल श्रीकांत शिंदे यांनी उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. तसेच काही जणांना आसुया असल्याचे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. 2022 मधील राजकीय घडामोडींमुळेच काहींना मंत्रिपद मिळाले, असा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी टीकेला एका वाक्यात उत्तर दिले. या सर्व घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून पुढे या वादाला कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
