Indian-Pakistan Conflict : ‘शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल, कारण..’, नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती

Indian-Pakistan Conflict : ‘शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल, कारण..’, नवाज शरीफच्या मुलीची दर्पोक्ती

| Updated on: Apr 30, 2025 | 12:55 PM

Pahalgam Terror Attack : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढला आहे. भारत हल्ला करेल या भीतीने पाकिस्तानकडून सातत्याने भेदरट वक्तव्य केले जात आहेत.

पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे. शत्रू हल्ल्याआधी 10 वेळा विचार करेल, अशी दर्पोक्ती नवाज शरीफ यांची मुलगी मरियम नवाज यांनी केलेली आहे. मरियम नवाज या पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आहेत.

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव वाढला आहे. सीमेवर पाकिस्तानच्या कुरापाती सुरूच आहेत. भारताकडून पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच सातत्याने पाकिस्तानी मंत्र्यांकडून अशा प्रकारच्या दर्पोक्ती केल्या जात आहे. एका कार्यक्रमात बोलताना मरियम नवाज म्हणाल्या की, भारत पाकिस्तान सीमेवर तणाव वाढत आहे. पण आपल्याला काळजी करण्याची गरज नाही. पाकिस्तान आणि पाकिस्तानच्या सैन्य दलाकडे एवढी ताकद आहे, की ते शत्रूचा मुकाबला करू शकतील. पाकिस्तानचा शत्रू पाकिस्तानवर हल्ला करताना 10 वेळा विचार करेल. कारण पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे, अशी दर्पोक्ती देखील मरियम नवाज यांनी यावेळी केली आहे.

Published on: Apr 30, 2025 12:55 PM