Dhananjay Munde : ‘बोलता येईना अन् डोळेही वाकडे…’, बाबासाहेब पाटलांच्या विधानानंतर मुंडेंनी स्वत:चं सांगितलं नेमकं झालंय काय?

Dhananjay Munde : ‘बोलता येईना अन् डोळेही वाकडे…’, बाबासाहेब पाटलांच्या विधानानंतर मुंडेंनी स्वत:चं सांगितलं नेमकं झालंय काय?

| Updated on: Apr 19, 2025 | 10:19 AM

'श्री बाबासाहेब पाटील यांची व माझी दोन दिवसांपूर्वी एका बैठकीत भेट झाली होती. त्यांनी माझ्याबद्दल काळजी व्यक्त केली त्याबद्दल आभार', असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय

राज्याचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होतेय. अशातच सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी माध्यमांशी बोलताना धनंजय मुंडे यांची तब्येत ठीक नाही. त्यांना बोलताही येत नाही आणि डोळेही वाकडे झाले आहेत, असं वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांच्या समर्थकांमध्ये धाकधूक वाढली असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, बाबासाहेब पाटील यांच्या वक्तव्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्वतः एक ट्वीट करत आपल्या आजाराची माहिती सर्वांना दिली. ‘आमचे सहकारी, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या एका विधानावरून मला अर्धांगवायू झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांवर प्रसारित केले जात आहे. मुळात मला बेल्स पाल्सी हा आजार दीड महिन्यांपूर्वी झालेला असून त्याचा परिणाम चेहऱ्यावर झाल्याने अजूनही मला बोलायला त्रास होतो’, असं धनंजय मुंडे यांनी सांगितले.

Published on: Apr 19, 2025 10:19 AM