Eknath Khadse : नाथाभाऊंच्या घरी चोरांनी अशी केली एन्ट्री, VIDEO आला समोर, भामट्यांनी काय-काय लुटलं?

Eknath Khadse : नाथाभाऊंच्या घरी चोरांनी अशी केली एन्ट्री, VIDEO आला समोर, भामट्यांनी काय-काय लुटलं?

| Updated on: Oct 28, 2025 | 3:48 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव येथील निवासस्थानी चोरी झाली आहे. दिवाळीच्या सुट्टीसाठी खडसे बाहेरगावी गेले असताना ही घटना घडली. चोरट्यांनी घरातून सुमारे ६८ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि ३५,००० रुपये रोख रक्कम चोरली. पोलिसांच्या पथकांकडून घटनेचा तपास सुरू असून सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगाव जिल्ह्यातील शिवराम नगर येथील निवासस्थानी चोरी झाल्याची महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये एकनाथ खडसे हे बाहेरगावी गेलेले असताना त्यांच्या बंद घराला चोरट्यांनी लक्ष्य केले. मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी घरातून सुमारे सात ते आठ तोळे सोने, म्हणजेच अंदाजे ६८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. याव्यतिरिक्त, घरातून ३५,००० रुपये रोख रक्कमही लंपास करण्यात आली आहे. घर बंद असल्याने आणि केअर टेकर नसल्याने चोरट्यांनी याचा फायदा घेतला, असे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई सुरू केली आहे. डॉग स्कॉड आणि फिंगरप्रिंट तज्ज्ञांची पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. तसेच, स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलीस स्टेशनची दोन स्वतंत्र पथके गुन्हेगारांचा शोध घेत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेगानं सुरू आहे.

Published on: Oct 28, 2025 03:48 PM